दूर ती नातिगोती अन दूर मायबाप तो

Started by siddheshwar vilas patankar, June 02, 2016, 07:22:54 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

दूर ती नातिगोती
अन दूर मायबाप तो
भाउबन्ध विसर आता
मोबाईल हा श्राप हो II
अपडेट तू करीत जा
स्टेटस तू स्वतःचे
मोह् माया जाल हे असे
विसर तू जवळचे II
शब्दांनी बांधला तू
फ्रेम मध्ये अडकला  तू
खेळणे हे हृदयाविना
तरी यात गुंतला तू II
शब्द जड झाले तुला
जिव्हा तुझी बंद ती
नयानांचे काम फार
माती मात्र मंद ती II
विसरलास कट्टा अन
गरम गरम कटिंग तू
दिवसरात्र फिरून हि
कोलेजची सेटिंग तू
दूर झाली ती नातिगोती
अन दूर मायबाप तो
भाउबन्ध विसरलो  आता
मोबाईल हा श्राप हो II

कवी :: सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C