चढणं म्हणजे काय असते रे भाऊ

Started by siddheshwar vilas patankar, June 02, 2016, 07:24:54 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

चढणं म्हणजे काय असते रे भौ

लेका, चढणं  म्हणजे विचारांशी लढण असते रे भौ I

लढता लढता पडणं , म्हणजे काय असते रे भौ

लेका , पडणं म्हणजे सवताच्या नजरेतन पडणं असते रे भौ I
   
नजरेतन पडणं म्हणजे काय असते रे भौ

लेका, नजरेतन पडणं म्हणजे मनाविरुद्ध उडणं असते रे भौ I

मनाविरुद्ध उडणं म्हणजे काय असते रे भौ

आरं लेका, तेच तर तुला सांगतोय

मनाविरुद्ध उडणं म्हणजे दुसरीकडे चढणं असते रे भौ I



कवी :: सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C