एकतेचे सारण

Started by siddheshwar vilas patankar, June 02, 2016, 07:26:31 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

तुझ्या नाना  रूपानीच घात केला

अन माणूस त्यासंगे वहात गेला

कुणी येशु म्हणे तर कुणी साई

कुणी अल्ला तर कुणी राम

नावे अनेक ती कोटी

या नावानीच तर घात केला

अन माणूस त्यासंगे वहात गेला II

येशूने शिवाचा , शिवाने अल्लाचा

अल्लाने साईचा अन साईने गणपतीचा घात केला

अन माणूस त्यासंगे वहात गेला II

रूपास्नागे पंथ जुळे अन पंथासंगे नाती

नात्यासंगे रक्त मिले पण उरे फक्त माती

तुझ्या या नाना रुपांनीच तर घात केला

अन माणूस त्यासंगे वहात गेला II

विनंती : माझ्या कवितेमुळे जर कुणाच्या भावना दुखावणार असतील तर मी जाहीर माफी मागतो . सर्व लोकांनी एकोप्याने रहावे एवढीच माझी नम्र ईच्छा  आहे.

कवी :: सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C