ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, June 03, 2016, 11:11:46 AM

Previous topic - Next topic

Lalit kumar

शाळेमध्ये रोज जाऊन
पुस्तकात घुसावं लागतं,!
पुढच्या वर्गात जायचं तर
परीक्षेत बसावं लागतं,!

पावसाळ्यात पिकाला
रोगांपासून जपाव लागतं,!
उन्हाळ्यात बळीराजाला
परीक्षेत बसावं लागतं,!

जेवढी शेकली जाते भाकर
तेवढच चूल्याला काम लागतं,!
चूला विझजताच शेतमजूरास
परीक्षेत बसावं लागतं,!

व्यापाऱ्याला माल घेतांना
फायदा तोटा सोडावं लागतं,!
आवक जावकच्या वादळात
परीक्षेत बसावं लागतं,!

कारखान्याच्या मालकाला
कामगारांच बघावं लागतं,!
वेळेत पगारपाणी, करांसाठी
परीक्षेत बसावं लागतं,!

कारखान्याच्या कामगारांना
उत्पादन वाढवाव लागतं,!
सुंदर टिकाऊ माल, नाहीतर
परीक्षेत बसावं लागतं,!

नेता बनने ही स्वप्य नाही
कार्यकर्त्यांना पटवाव लागतं,!
निवडणूक रिगणात उतरून
परीक्षेत बसावं लागतं,!

सत्ता हाती आली तरी
विरोधकांना डरावं लागतं,!
एका चूकीच्या निर्णयाने ही
परीक्षेत बसावं लागतं,!

एका ठिकाणी सुखी जीवण
सांगा कुठे बरं ते असतं,??
मरेपर्यत महिनोमहिनी फक्त
सरकारी बँकेत जाव लागतं,!

ललित कुमार,,,,,
wapp7744881103
*****************