एकदा टारझन अंगात आला

Started by siddheshwar vilas patankar, June 03, 2016, 04:42:04 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

एकदा टारझन अंगात आला

काढून टाकले कपडे सर्व

पायपुसण्याचा  लंगोट केला

अन जंगल प्रवास सुरु झाला

ओळखू नये म्हणून हेल्मेट घातले

बाहेर पडलो घराच्या

बाहेर येताक्षणी मागोमाग

भरपूर सारे कुत्रे लागले

पारंब्या अन वेली  शोधू लागलो

नव्हत्या त्या म्हणून गाड्यांवरून

उड्या मारू लागलो

स्टेमीना संपत आला होता

लंगोट कधीच मागे पडून

राहिलं होतं फक्त हेल्मेट

टारझन बनण्याच्या नादात

पुरता झालो होतो चेकमेट


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C

rudra


spatankar_13

धन्यवाद मित्रा . आपण सर्व आनंदी हसत खेळत राहावे हीच इच्छा .