करायला गेलो आत्महत्या

Started by siddheshwar vilas patankar, June 03, 2016, 07:24:21 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

केलेल्या कृत्यांचा  पश्चाताप  म्हणून

करायला गेलो आत्महत्या

टाकला दोर वर पंख्यांला

राहत्या नव्या  घरी 

घेतला गळफास तेव्हा

गदागदा हलु लागले सिलिंग

नको तो डोक्याला ताप झाला

सिलिंगसकट वरचा माणूस खाली आला

दोघेही उताणे एकावर एक पडलो

दोघेही जागच्या जागीच मोडलो

घातली बिल्डरच्या नावाने शिवी

साला बिल्डर हाय कि न्हावी ?

साल्याने एवढी मोठी इमारत बांधली

पण साधी एक आत्महत्या करताना

शेण  अन माती खाल्ली

त्याची कामातली भेसळ उघडी झाली

केवळ माझ्या त्या प्रयत्नामुळे

त्याची उखडली गेली पाळेमुळे




सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C

ashok reddy


spatankar_13

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

मित्रा तुझ्या अभिप्रायाने मी आज धन्य  झालो . मातृभाषेचे पांग फेडल्याप्रमाणे वाटले बघ . धन्यवाद मित्रा . असे वाटतेय अटकेपार झेंडा फडकला एकदा .