प्रेमबीम काही नको बघ

Started by vbhutkar, June 03, 2016, 09:25:00 PM

Previous topic - Next topic

vbhutkar




प्रेमबिम जाऊ दे रे
त्यातलं मला काही नको.
हवीशी तुझी ती रोजची
मित्रांच्या पलीकडून
मला शोधणारी नजर!

मैत्रिणींशी गप्पा मारल्यानंतर
फक्त 'हाय' करण्यासाठी केलेली
पापण्यांची उघडझाप आणि
ओठांवर आलेली एक रेष.

सगळे निघून गेल्यावर
शेवटी बाय करण्यासाठी
रेंगाळलेली पावलं.
आणि गेलाच निघून तर
बाईकने मागे येऊन मारलेली
अजून एक चक्कर.

'सारी डे' ला नाही सांगितलं
'दिसतेय कशी'तरीही
पाहण्यासाठी केलेली धडपड.
वाढदिवसाला केलेला पहिला फोन
आणि शेवटचाही.

भावासोबत असताना मी दिसल्यावर,
हसू लपवायला केलेली धावपळ.
मी निघताना
सर्वांनी मागितलेली पार्टी
त्यात हरवलेलं तुझं हसू
पण सोबत छोटंसं गिफ्टही.

बऱ्याच दिवसांनी पाहिल्यावर
घेतलेला एक दीर्घ श्वास
आणि मला सामावाण्यासाठी
बंद केलेले डोळे...
बस इतकंच बास आहे.
बाकी प्रेमबीम काही नको बघ!


विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

सुमित

Kharach khup khup khup chhan aahe hi poem.  Sunder Ekdam.