ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, June 04, 2016, 11:44:50 AM

Previous topic - Next topic

Lalit kumar

अन्नापेक्षा मोठा
कुठला देव असेल तर सांगा हो
पोटाची भूकपेक्षा मोठा
कुठला धर्म असेल तर सांगा हो
मानवतावादी संविधानापेक्षा
कुठला धर्मग्रंथ असेल तर सांगा हो
मला धर्मांतरण करायचय।।
अन्नदान पेक्षा मोठ
कुठल दान असत तर सांगा हो
वस्त्रनिवार्या देण्यापेक्षा दुसरा
पुण्याचा मार्ग असेल तर सांगा हो
दानपेटीत दान टाकून
खरच पुण्य मिळत का सांगा हो
मला जरा पुण्य करायचय।।
अंधअपंगांना मदतीपेक्षा मोठी
कुठली तीर्थयात्रा असेला तर सांगा हो
रडणार्याचे अश्रू पूसण्यापेक्षा
कुठली पुजा असेल तर सांगा हो
दुःखीचे मन वाचण्यापेक्षा मोठ
कुठल पुस्तक असेल तर सांगा हो
मला आराधना करायचीय।।
स्वबुध्दीवर श्रद्धा ठेवाण्यापेक्षा
कुठली श्रध्दा असेल तर सांगा हो
आत्मविश्वास पेक्षा मोठा
कुठला चमत्कार असेल तर सांगा हो
कष्टा पेक्षा मोठी
कुठली आस्था असेल तर सांगा हो
मला मनसमाधान पाहिजेल।।
आईबापापेक्षा मोठे
कुठले देव असतील तर सांगा हो
मानवधर्मापेक्षा मोठा
कुठला धर्म असेल तर सांगा हो
मला धर्मांतरण करायचय।।

ललित कुमार
wapp7744881103
*********************