ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, June 04, 2016, 01:36:00 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

चोरी केली शिक्षा होईल
भिती मनामध्ये असावी
चोरीकरून सापडल्यावर
कारणे बिलकूल नसावी,!

चोरीमध्ये वाटा ज्यास दिला
सापडल्यावर, तो दूर जाईल
तुम्हच्या मागेपुढे फिरणारा
तो पहिले विरोधात जाईल,!

इज्जत जाईल गावामध्ये
मग बदनामीचा दाग लागेल
नंतर कितीही बदलले तुम्ही
शुद्धतेचा पुरावा द्यावा लागेल,!

पचवले जरी चोरी करून
एकदिवस सर्वासमोर येणार
कष्टाने कमावलेला पाईपाई
संशयाच्या घेऱ्यात येणार,!

विचार करा, चूकी नको
मेल्यावर काय साथ येणार
कमावलेली इज्जत , नाव
तेच तुमचे म्हणून राहणार,!

ललित कुमार
wapp7744881103
----------------------------------