माझे मन......

Started by Ashok_rokade24, June 04, 2016, 10:12:49 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

मनाच्या तळाला एक विहीर ,
आटलेली,दगड मातीने बुजलेली ,
तरीही मातीखाली एक कोपरा ,
ओला , अंकुर घेऊन लपलेला ,
गत आठवणींना ऊजाळा देणारा,
कधी तरी विहीरी काठी,
बहरलेले होते एक फुल झाड,
फुलपाखरांचा थवा,
चिमण्यांचा चिवचिवाट,
तृप्ती मना देणारा सुगंधी वारा,
मग अचानक कधीतरी,
विळखा नागीणीचा पडला,
पाने फुले जळून गेली ,
वारा सारा विषमय झाला,
पुत्कार नागीनीचे रात्रंदिनी,
भयाण स्तब्धता चहू दिशांनी,
ओसाड विहीर सारी झाली,
दगड मातीने भरून गेली,
तरीही एक कोपरा ईवलासा,
ओल घेऊन लपून राहीलेला,
पाहण्या झाड सुगंधी अंकुराचे,
मनी आस धरून बसलेला ,?????
मनी आस धरून बसलेला ,?????

अशोक रोकडे.
9224184793
मुंबई.