आयुष्य हे.....

Started by Ashok_rokade24, June 05, 2016, 02:39:45 AM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

हिरवळीवर चालणे कधी जमलेच नाही,         
काटे कधी बोचले ते कळलेच नाही ||
सावली च्या ओढीने वृक्षा खाली धावलो,
पण वारूळे मुंग्यांची कधी दिसलीच नही॥
ग म भ ण सदा गिरवत  राहीलो,
पण गणित आयुष्या चे कधी सुटलेच नाहि ॥
थोडी चमक दृष्टीपथास आली ,
पण ते मृगजळ होते कधी कळले च नाही ||                   
कशा साठी पोटा साठी आठवत धावलो
पण मनसोक्त जगणे कधी जमलेच नाहि ||
सगेसोयरे मित्र आप्तेष्ट सर्व आसुन हि,
एकटा कधी झालो ते कळलेच नाहि  ||
जिवणातील ऊतारी तोल सावरीत राहिलो,
पण बदनाम कधी झालो कळलेच नाही॥
आयुष्यातील संकटी सदा सामोरा गेलो,
पण निर्बल कधी झालो कळलेच नाहि ॥
आता पुन्हा हिरवळ दिसणार नाही,
आता पुन्हा  चालणे जमणार नाही ॥
आले तसे गेले आयुष्य, जगलो जिवन,
किडा मुंगीचे कसे ते कळले च नाही॥

               अशोक रोकडे
              ९२२४१८४७९३
                     मुंबइ