सवाल ?

Started by harsh Borse, June 05, 2016, 10:15:23 AM

Previous topic - Next topic

harsh Borse

ना उद्याची फिकीर, ना पैशाचा ध्यास आहे,
पोटातल्या कावळ्यांचा, भूक एव्हडाच सवाल आहे,

कोणी खातोय तुपाशी, तर कुठे केशराचा वास आहे,
हातात त्या इवल्याश्या, अजून कोरडाच घास आहे,

कोणी द्यावे कोणी घ्यावे, हा व्यवहाराचा भाग आहे,
हिशेब चुकतात इथे साऱ्यांचे, ताळेबंदात घात आहे,

कधी रनरनत उन तर, कधी अंधाराची काळी रात आहे,
गर्दीत हरवून आपल्यांच्याच, सुटतात आपलेच का हात आहे,

~ह.सु.बोरसे