गझल

Started by Ravi kamble, June 05, 2016, 01:08:16 PM

Previous topic - Next topic

Ravi kamble

मित्रा..,

भामट्यांशी यारगीरी टाळ मित्रा
मोजके खंबीर साथी पाळ मित्रा

गावगाडा हाकण्यातच वेळ गेला
पोट आधी आपले सांभाळ मित्रा

जाण रे तू कोण  खोटे, कोण मोठे
जास्त नाही जिंदगीला काळ मित्रा

कोण नाही  येत कामी संकटाला
तू तुझा रे घाम आता गाळ मित्रा

ध्यास घे तू अंबराला टेकण्याचा
ठेंगणे वाटेल हे आभाळ मित्रा.!

©रवींद्र कांबळे    9112143360
व्हाट्सप क्रमांक. 9970291212