ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, June 05, 2016, 01:17:40 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

बापाने तुला वाढवल
आईने तुला घडवल,!
तु त्यांनाच रडवल
थु तुझ्या तोडावर थु,,!

नवस केलथा तुझा
उपवास केलथा तुझा,!
पुजाअर्च्या करे आई
जन्म झालथा तुझा,!

अशक्त होता तु
राहिला नसता जगात,!
रक्ताच दुध करुन
केली तुझी निगात,!

पाहिजे ते सांगायचा
हट्ट धरुन मागायचा,!
आठव जरा बालपण
बाप हट्ट पुरवायचा,!

चागले कपडे तुला
बाप फाटके घाली
चागली चप्पल तुला
बाप अनवाणी चाली,!

बाप शिकला नाही
तुला त्याने शिकवल,!
बाप कष्ट करत राहिला
तुझे स्वप्न त्यानेच अवतरल,!

आज ते म्हातारे झाले
त्यांना तु रडवतोस,!
लाज वाटतेका तुला
त्यांना तु सतावतोस,!

लक्षात ठेव,,,
ते आज म्हातारे झाले
तु ही कधी होणार,!
त्यांना जसे वागवशील
तसे तुझ्याशी ही होणार ,!

ललित कुमार
wapp7744881103
********************