मैत्रीची परी

Started by बुद्धभूषण गंगावणे, June 05, 2016, 06:03:30 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

मैत्रीची परी

माझ्या आयुष्याच्या दारावर
मैत्री ची चाहूल झाली,
मैत्रीच वरदान घेऊन
मैत्रीची परी आली.

अनोळखी होतो मी
अनोळखी होती ती,
माझ्याशी मैत्री करून
आयुष्य बदलून गेली.

सौंदर्याच फूल होती ती
माझ्या ओसाड पडलेल्या
मनाच्या रानात मैत्रीची
बाग फूलवून गेली.

तिच्या साठी बच्चा होतो मी
तिच्या साठी बावळट होतो मी
पण मना मध्ये पवित्र
मैत्रीच्या प्रेमाची शिकवण
घेऊन आली.

मला समजून घेतल तिने
माझ्या चुका सहजपणे
माफ करत आली.

माझ्या आयुष्याच्या दारावर
मैत्री ची चाहूल झाली,
मैत्रीच वरदान घेऊन
मैत्रीची परी आली.

कवि : बुद्धभूषण गंगावणे.
7738628059
gangawanebuddhabhushan@gmail.com

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]