बरस रे... (भाग २)

Started by गणेश म. तायडे, June 05, 2016, 09:29:33 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

बरस बाबा बरस
आता थांबू नको
शेतकऱ्यांच्या जिवावर
पुन्हा रूसू नको
झाले गेले आता
तु विसरशील का?
आमच्या काळ्या
मातीला भिजवशील का?
वांजोट्या नद्यांची
ओटी भरशील का?
सांग बाबा यंदा
तु बरसशील का?
गुरं ढोरं सारी
कासावीस झाली
तुझ्या चाहूलीने सारी
तल्लीन झाली
कोकीळेचा सुर
पुन्हा गुंजणार का?
काळ्या काळ्या मातीत
मोर नाचणार का?
पाऊल टाकलेली तु
आता मागे नको वळू
जिवाची घालमेल
आता नको करू
देव तु आमचा
फेडू तुझे नवस
बरस बाबा यंदा
तु जोरात बरस...

- गणेश म. तायडे,
   खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com