मराठा

Started by sachinikam, June 06, 2016, 10:19:51 AM

Previous topic - Next topic

sachinikam


मराठा


मोडेन पण वाकणार नाही
संपलो बेहत्तर झुकणार नाही
स्वाभिमानी बाणेदार
स्वावलंबी इमानदार
बलभीम यष्टी पीळदार
मस्तकी युक्तींचा साठा
ऐसा मी मराठा.


शौर्य मनगटात माझ्या
हृदयी दयेचा ठोका
मन धीट माझे
कणखर माझा मणका
चित्तथरारक कर्तबगारीने
काढतो गनिमांचा काटा
ऐसा मी मराठा.


मायभूमीच्या रक्षणासाठी
मायबोलीच्या जतनासाठी
लावतो प्राण पणाला
भगव्याचा मी सच्चा भक्त
सळसळते धमन्यांत युवा रक्त
चिरुनी समुद्राच्या लाटा
जिंकतो साऱ्या बिकट वाटा
ऐसा मी मराठा.


वारकरी भजतो विठोबाचा
मावळा लढतो शिवबाचा
अंतरी नांदते सदा
ज्ञानेश्वरी अन गाथा
ऐसा मी मराठा.


================================
कवितासंग्रह : मुक्तस्पंदन
कवी : सचिन निकम, पुणे
९८९००१६८२५, sachinikam@gmail.com
https://www.facebook.com/MuktSpandan-192857214071279/...
================================


sachinikam

ऐसा मी मराठा.