मुलगा-मुलगी होईलं समानं, पन जरा दमानं-दमानं...

Started by smitabhosale.sb, June 07, 2016, 02:05:09 PM

Previous topic - Next topic

smitabhosale.sb

मुलगा-मुलगी होईलं समानं, पन जरा दमानं-दमानं

समानता नाही येनारं कधी कायद्यानं,
नाही येनारं ती स्त्री-मुक्तीच्या आरड्यानं,
तिच्यासाटी आई-बापाला करावं लागंल, जीवाचं की हो रानं...
मुलगा-मुलगी होईलं समानं, पन जरा दमानं-दमानं..

समानता जशी हवी शिक्शनातं,
तशी हवी खान्यातं अन् पिन्यातं..
समानता जशी हवी कपड्यातं,
तशी हवी नीतीमत्तेच्या जोखडातं..
मुलालाबी ठेवा आठनंतर घरातं,
रात्री फिरन्यात त्याची नाही हो शानं...
मुलगा-मुलगी होईल समानं, पन जरा दमानं-दमानं...

समानता जशी हवी बाहेर कामातं,
तशी हवी सैपाक अन् घरकामातं..
समानता जशी हवी खेळ खेळन्यातं,
तशी हवी सारी व्रतं-सणवारं पाळन्यातं..
मुलालाबी लावा शिस्तीचा तुमी लगामं,
दुबळ्यावर अन्याय नको त्याला असू द्या भानं...
मुलगा-मुलगी होईलं समानं, पन जरा दमानं-दमानं..

तिच्यासाटी आई-बापाला करावं लागंल, जीवाचं की हो रानं...
मुलगा-मुलगी होईलं समानं, पन जरा दमानं-दमानं..

                                                    ....स्मिता भोसले