उजळू सारा संसार...

Started by smitabhosale.sb, June 07, 2016, 02:13:34 PM

Previous topic - Next topic

smitabhosale.sb

दिव्याविना वात अन् वातीविना दिवा,
देऊ शकणार नाही कधी, प्रकाश जो हवा...

प्रकाशासाठी दिव्यानं द्यायचा असतो वातीला आधार,
ममतामयी स्निग्धतेनं हलका करायचा असतो तिचा भार...

प्रकाशासाठी वातीनंही करायचे असतात चटके सहन,
सद्गुणांच्या ज्योतीनं उजळायचं असतं दिव्याचं अंगण...

दोघांनीही करायची नसते एकमेकांची उपेक्शा,
एकमेकांच्या विश्वासानं फुलवायंची असते प्रकाशाची कक्शा...

अशा हजारों दिवा वातींच्या आवलीनं नष्ट होतं काळोखाचं रान,
समाज घडतो क्शणो-क्शणी ठेवून प्रकाशमय विकासाचं भान...

चला आपणही लावू या विकासाला हातभार ,
दिवा-वातीचे गुण आत्मसात करून उजळू सारा संसार...

                                              .....स्मिता भोसले