विकासाच्या दिशेनं धावताना...

Started by smitabhosale.sb, June 07, 2016, 02:16:44 PM

Previous topic - Next topic

smitabhosale.sb

विकासाच्या दिशेनं धावताना .
सत्त्वपरिक्शा घेतो देव पावताना !!!


सक्शमता पावलो पावली
करावे लागते सिद्ध,
असलेल्या नसलेल्या शिरपेचात
तुरे मानाचे खोवताना...

बालपणीचे सखे सोबती
असो जीवलग कुणी किती,
सारी नाती सारावी लागतात
झेंडे यशाचे रोवताना...

एका सुखामागे असतात
दडलेली कैक दुःखं,
तारांबळ उडते सुक्शणी
आसवं डोळ्यातली लपवंताना...

एकीकडे झकास विकास
दुसरीकडे भकास भकास,
दोहोंमध्ये समन्वय
जमता जमत नाही जमवंताना...

विकासाच्या धुंद नशेत
हरवलायं जाणता समाज,
विकास कुणाचा? कशासाठी?
शोध लागता लागत नाही, लावंताना...

विकास व्हावा सर्वांचा
अनुसरून योग्यतेला,
अयोग्यतेचा विकास ठरतो बाधक
सभ्य समाज घडवंताना...

विकासाच्या दिशेनं धावताना.
सत्त्वपरिक्शा घेतो देव पावताना !!!


                      .....स्मिता भोसले

Dhanraj salunkhe

khup chan inspiration kavita....... :) :)
thax
and al d best ur great future...