प्रेम

Started by Kunte mahadev, June 10, 2016, 06:19:40 PM

Previous topic - Next topic

Kunte mahadev

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....

मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....

तिला कळतच नाही

*****************************
*****************************
      महादेव कुंटे मो.9075197777

कवी

थेंब गालावरून निथळे खांद्यावरी, त्या नितळ थेंबात भिजू दे.
केस ओले तुझे, जीव नव्याने रुजे, आग या मनाची विझू दे.
हा देह आगीचा शांत कर चुम्बुनी, आणखी नको लाउस आग पाहून लांबुनी.
स्वर्ग सुख तोकडे, तू जवळी असता लाडके, मांडीवर शांत तुझ्या निजू दे.

माझी वाट दूरची, दूरच्या गावची, थांबलो मी जरा विश्रांती घ्यायला,
खूप काही इथून न्यायचे मला जरी, पाहुनी मी तुला लागलो सर्वस्व द्यायला
एक हळुवार श्वास टाक माझ्यावरी, अलवार पाऊल ठेव माझ्या घरी,
घेऊ मिटुनी सारी कवाडे दाराची, घेऊ उघडून कवाडे अंतरीची,
देह माझा कधीतरी घे बाहोत लपेटून, देहास तुझ्या मिठीत सजू दे.
कवी~ महादेव कुंटे मो 9075197777

Kunte mahadev

तू सोबत होतीस म्हणून..!!
मला एकटे कधीच वाटलं नाही
तू सोबत होतीस म्हणून दू:खात कधी भिजलो नाही
दूर वादळे दिसताना  मी घाबरलो नाही
त्यास कधी सापडलो नाही
तू सोबत होतीस म्हणून....!! आयूष्याच्या वाटेत मी कधी डगमगलो नाही
एकटयाचे जिवन होते न कूणी सोबत होते
न कूणी ओळखीचे तू भेटलीस
अन....
ओळख मज मिळाली
नव्या जिवनाची पहाट मज मिळाली
तू सोबत होतीस म्हणून..!!
चांदण्यांना पाहताना  वाटायचे
माझेही कूणी असावे
लाख चांदण्या आहेत येथे
मग मलाच का एकटेपण मिळावे..
कवी~महादेव कुंटे मो, 9075197777

महादेव कुंटे



Kunte mahadev


ओठाना जे जमत नाही ते
फूल बोलतात,
मनातल्या भावना ते
रंगामधून तोलतात,
मनातील फुलांना तर
मंगल्याचा गंध असतो,
मनापासून प्रेम करण्यात
खरचं किती आनंद असतो
कवी~महादेव कुंटे मो, 9075197777

कविता प्रेम

ओठाना जे जमत नाही ते
फूल बोलतात,
मनातल्या भावना ते
रंगामधून तोलतात,
मनातील फुलांना तर
मंगल्याचा गंध असतो,
मनापासून प्रेम करण्यात
खरचं किती आनंद असतो
कवी~महादेव कुंटे मो, 9075197777