आता तरी बरस...

Started by vishal harel, June 10, 2016, 09:28:02 PM

Previous topic - Next topic

vishal harel

वेळ काळ सरला,
परि तु ना अवतरला...
भास सारे होती तुझे,
पण तुझा स्पर्श ना झाला....||

दया दावुनी बरस तु बेधुंद,
राजा माझा व्याकुळ झाला
मातीला सरींचा बंध,
परि जीव का तळमळला...||
.
निळशार गगन काळ भरती,
परि बरसे ना कोरडी हि धरती....
म़त्युची असावी जशी जगण्याची झुंझ,
तशास परिने तुझ तांडव करती...||
.
मोकळ्या नलयना सारया,
जीव तयाचा तुटतो...
घुटमळती श्वास सारे,
परि तुला पाजर ना फुटतो...||
.
रान वन जटती सारे,
वाढ न तयास...
कोरडली पाखरे सारे,
चिंब कर थव्यास..||
.
बरसन्यास कसला हा तोटा,
का स्वयं टाळतो...
भासेल गरज ही तुझला,
त्या क्षणी जान होईल का जीव हा जळतो....||
.
तुझला देई मान सारे,
रुप तुझ सरस..
नको विलंब कसला,
पावसा आता तरी बरस...
पावसा आता तरी बरस...||

कवि -विशाल हरेल.. मुंबई
मो.8425053610