उदासी...

Started by गणेश म. तायडे, June 11, 2016, 12:39:13 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

नको बसू अशी
उदास नदीकाठी
पहावे ना मज
तुझी ही उदासी
बोल काहीतरी
शब्द दे मला
स्पर्श कर मला
ओंजळीत घे मला
प्रतिबिंब तुझे हवे
माझ्यावर तरंगणारे
हवेने वाहणारे
स्पर्शाने शहारणारे
लपवून रूसवा
कुणीतरी हसवा
माझ्या जिवाला
कुणीतरी जगवा
दे ओठांचे हसू
डोळ्यांच्या नजरा
केसांचा गजरा
लाजणारा चेहरा

- गणेश म. तायडे,
    खामगांव
    ganesh.tayade1111@gmail.com