पाऊस...तूझा माझा

Started by शिवाजी सांगळे, June 12, 2016, 07:55:38 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पाऊस...तूझा माझा

पागोळीत ओघळणारा
तळव्यावर नाचणारा
स्वप्नात जगविणारा
पाऊस...... तूझा

मुसळधार बरसणारा
थोडी फुरसत देणारा
चहाभजी आठवणारा
पाऊस.......... माझा

कसा कोण जाणे
हरवला हळुहळू तो
छत्रीत भिजविणारा
पाऊस... तूझा माझा

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९