प्रेम हे फुलपाखरा सारखे आहे

Started by Kunte mahadev, June 12, 2016, 10:35:53 PM

Previous topic - Next topic

Kunte mahadev

प्रेम हे फुलपाखरा सारखे आहे जेव्हा

तुम्ही त्याला पकडायला जाता तेव्हा ते

दुसरीकडे उडून जाते पण जेव्हा तुम्ही

शांत असता तेव्हा ते हळूच येते आणि

तुम्हाला स्पर्श करते, तुमचे होउन जाते
म्हणून वाट बघुयात आपापल्या फुलपाखराची.......✍🏿
*****************************
     महादेव

महादेव

कवी- महादेव कुंटे मो ९०७५१९७७७७
असंच तू माझ्या डोळ्यांतं पाहावं  आणि मी तुझ्या अस़चं
तू माझ्या डोळ्यांत पाहावं आणि मी तुझ्या पाहत पाहत
दोघांनी आंधळं व्हावं,
कारण प्रेम हे अंधळच असतं म्हणतात !
कसं सांगू तुला किती जड झालंय जगायला एकेक महिना
तुझा चेहरा नाही मिळत बघायला.

Kunte mahadev

♛♛स्वर्गापेक्षा जास्त प्रेम मी माझ्या
मित्रांवर करतो....♛♛ ♛♛कारण स्वर्ग आहे की
नाही हे कोणाला माहित नाही ♛♛ ♛♛परंतु!
जिवाला जिव देणारे "मित्र" माझ्या आयुष्यात
आहे !!!! ♛♛

   🙏🏻🙏🏻  शुभ प्रभात 🙏🏻🙏🏻

Kunte mahadev

महादेव कुंटे मो, 9075197777
असे असावे प्रेम
केवळ शब्दानेच नव्हे
तर नजरेने समजणारे...
असे असावे प्रेम
केवळ सावलीतच नव्हे
उन्हात साथ देणारे...
असे असावे प्रेम
केवळ सुखातच नव्हे
तर दु:खातही साथ देणारे...

Kunte mahadev

कुणीतरी आपल्यासाठी असावे
का कुणास ठाऊक प्रत्येकाला वाटते
कुणीतरी आपल्यासाठी असावे
ज्याच्यावर आपण थोडेफार रुसावे
आपल्या डोळ्यातील अश्रु एकदा तरी त्यानेच पुसावे
रागवता आपण, त्याने आपल्याला समजवावे

मनातील व्यथांना त्याच्याच जवळ मोकळे करावे
उशिर झाला केव्हा तर लटके लटके रुसावे
पण वाट पहात आपली त्याने तिथेच असावे

केव्हा नटता सावरता आपण
त्याने मनापासुन कौतुक करावे
का कुणास ठाऊक प्रत्येकालाच वाटते..
कुणीतरी आपल्यासाठी असावे..

प्रेम कविता

प्रेम  म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट..
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..
फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं
कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं
नेहमी  ऊगवणारी सुंदर सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..
प्रेम  म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा
अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...
ऐकत  रहावी अशी हरीची बासरी
अस्मानीची असावी जशी एक परी

कवी~महादेव कुंटे मो, 9075197777

महादेव कुंटे

टिप टिप पाऊस
झो झो वारा
गीत गाऊ पाहतो
आसमंत सारा
कडाडणारी वीज
गडगडणारे ढग
धावण्यार्‍या छत्रीतली
आपली लगबग
डराव्‌ डराव्‌ बेडकं
छम छम तळे
लेझीम हाती घेऊनी जणू
थेंब लाटेवर पळे
खळ खळ झरा
तड तड पत्रा
पावसाने भरवली बघा
ताला सुरांची जत्रा

महादेव कुंटे

पाऊस सगळ्यांचाच असतो
सगळ्यांनी तो भोगलेलाही असतो
मलाही पाऊस माहीत आहे
मीही पाऊस कधीतरी
भोगलेला आहे
झेललेलाही आहे
माझ्यासाठी
पाऊस म्हणजे
फक्त एक आठवण
लहानपणी माझा बाप
जेव्हा मारायचा
माझ्या आईला
योगायोगाने नाही
पण
पाऊस बाहेर
पडत रहायचा
माझ्या आईचे
पाणावलेले डोळे
मला फक्त दिसायचे
तिच्या डोळ्यातील
पाऊस
तोच पाऊस
मला आठवतो
तोच पाऊस मला
माहित आहे
माझ्यासाठी
पाऊस म्हणजे
दु:ख, यातना, क्लेष
अश्रू, हंबरडा
आणि मूक विलाप
माझ्या आईचा
पाऊस म्हणजे
माझ्यासाठी नेहमीच
पाण्याचा अर्थहीन
थेंबांचा
आणि
माझ्या गेलेल्या
आईच्या आठवणींचा

Kunte mahadev

ती कधी बोललीच नव्हती पण मी ऐकत आलो......

ती कधी बोलली नाही
पण मी ऐकत आलो,
ती कधी तशी नव्हती
पण मी समजत आलो.

ती फक्त माझ्याशी मैत्री
म्हाणुन गोड बोलायची,
मी कुठेही दीसलो की
मला पाहुन गालात हसायची.


झाला मला गैर समज
तीचे प्रेम असल्याचा,
कधीही सुगावा लागला नाही
असे काही नसल्याचा.

तीला हे वीचारायला
मला नाही कधी जमले,
खुप हीम्मत करून
शेवटी मी तीला वीचारले.

मी काही पण बोलतोय
असे बोलुन तीने ते नाकारले,

खरच ती कधी बोललीच नव्हती

Kunte mahadev

आजही ती तशीच आहे,जशी पुर्वी होती.
आजही माझ्यात प्रेमाची भावना आहे,
जशी पुर्वी होती.
हीम्मत नाही मला तीला
हे वीचारण्याची.
ती ही प्रेम करत असणार पण भीती वाटते,
तीचा नकार ऐकण्यची.
म्हणुन मी आता ती
दीसल्यावर नजर चुकवतो.
तीच्या पासुन दुर गेल्यावर
स्वःतावरच रागावतो.
आणी मोकळा वेळ मीळाल्यस
मग तीच्यावरच कवीता
सुचवतो.🌷🌷🌷🌷🌷🌷.     ..........................
कवी~महादेव कुंटे मो,09075197777