कविता तुझ्या आणि माझ्या

Started by श्री. प्रकाश साळवी, June 13, 2016, 03:19:41 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

कविता तुझ्या आणि माझ्या
आपल्या मैत्रीच्या
अतुट नात्याच्या
राघु मैनेच्या प्रेमाच्या
फूल पानांच्या ॥१॥
कविता तुझ्या आणि माझ्या
धुंद करणा-या सागराच्या
बेधुंद बरसणा-या पावसाच्या
जाई जुई मोग-याच्या
थोड्या दूःखाच्या खूप सुखाच्या ॥२॥
कविता तुझ्या आणि माझ्या
रंगबिंगी फूल पाखरांच्या
फळांच्या ईंद्रधनुच्या
मंद धुंद वा-याच्या
स्वैर स्वछंद मनाच्या ॥३॥
कविता तुझ्या आणि माझ्या
खुप खुप गमतिच्या
आपल्या नव्या मैत्रीच्या
तुझ्या माझ्या हृदयीच्या
शब्दात बांधलेल्या कवितेच्या ॥४॥
**
प्रकाश साळवी