चीतेची चिंता...........

Started by Ashok_rokade24, June 13, 2016, 06:14:39 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

चितेची चिंता का करावी आता,
मिटताच डोळे,मिटतिल सर्व चिंता,
कोण माझा,मी कुणाचा,
कुणासाठी काय केले,
सुटेल ते गणित जे, जिवनी अडलेले,
राहिले कार्य अघुरे,पुर्ण आपसूक होइल,
नको चिंता आता,चितेत विरून जाइल,
हे आप्तेष्ट माझे,हे माझे सगेसोयरे,
दोन दिवसाचे दुख्ख,विसरतिल सारे
आता न कसली ईच्छा, न कसला ध्यास,
शेवट व्हावा सुखमय एकच आस,
तरीही वाटे मनी, ऐसे एकदा घडावे,
दोन अश्रु तुझे, चितेवर माझ्या पडावे, ??
दोन अश्रू तुझे, चितेवर माझ्या पडावे???

                    अशोक मु. रोकडे .
                      9224184793.