नकळत ऊघडली मुठ.............

Started by Ashok_rokade24, June 13, 2016, 06:36:12 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

नकळत ऊघडली मुठ ,
जीवन पसार झाले ,
रिक्त हाती आता,
काहीच न ऊरले ,

फुल जळाले वेलीवरले,
निर्माल्य हाती राहीले ,
मिळेल सुगंघ कैसा ,
सारी कागदी फुले ,

संसारा चे ओझे माथी,
सारे काही जड झाले ,
शरीर थकले साथीला ,
मन ही दुबळे झाले ,

शोध सुखाचा घेत हिंडलो,
स्पर्श सुखाचा अजून होईना,
थकून गेली काया सारी ,
वेळ काळही सरत आले ,

शुन्यातून येणे झाले ,
शुन्यातच जाणे आहे ,
बंद मुठी घेऊन आलो ,
आता हस्त रिक्तची जाहले.............
आता हस्त रिक्तची जाहले.............

           अशोक मु. रोकडे.
             9224184793.
,