शाळेतलं पिरम...!!! ( भाग- २)

Started by Ravi Padekar, June 14, 2016, 03:39:04 PM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

    पाऊस तर कोसळतच होता....त्यात आज पहिला दिवस शाळेचा....नवीन शर्टचा वास पण मातीतल्या ओलसर गंधातून निघालेल्या सुवासाला साथ देत होता....रम्य असं वातावरण पसरलं होत....घंटा वाजली अन ती वर्गात आली... थोडी  भिजलेलीच होती.... नवीन असल्याने कळलं नाही तिला कुठे बसावं... अन ती सोनल च्या शेजारी जाऊन बसली.... मुलं तर तिच्याकडे अशी बघत होती... जणू काय अप्सराचं अवतरली आहे  वर्गात......तिने बांधलेल्या त्या दोन वेण्या, ते बारीक असे डोळे, अन ते कोमल असे गाल......तो सुंदर चेहरा....

"नवीन हाय  वाटत ही?.... जितूने म्हटले
"हो मुंबई वरुन आली आहे ".... दिगंबर
"तुला कसं ठाऊक रं".... जितू
"त्या दिशी जे काका भेटले ना ते पप्पा हाय तिचे"....
"असं हाय काय...काय भारी पोरगी हाय रं "

दूसर्‍या दिवशी जितू तिच्या समोरच्याच बाकावर बसलेला होता.....तशी त्याची जागा कधी fixed नसे वर्गात.....जशी काय शाळाच याच्या बापाची...... हिन्दी चा लेक्चर चालू  झाला होता..... पाठ का नाम- "सरला की आत्मकथा"..... पहिलाच धडा होता....मोहिते सरांनी शिकवायला सुरवात केली...  सरला एक महान महिला थी!  जिन्होने अपना सारा जीवन गरीब और जरूरतमंद लोगों की मदद में लगा दिया....! एक दिन सरला कोने में बैठ के चावल मे से खडे निकाल रही थी...! तभि....  सर्व शांत ऐकत होते..... एकजण मात्र त्याच्याच धुंदीत बेंचवर काहीतरी लिहीत होता..... थोरात सरांनी खडू फेकून मारला.... आणि म्हटले "कुणीकडं लक्ष हाय तुझ ? उभा रहा आणि सांग....

"सरला कोने में बैठ के कया कर रही थी ?"
मित्राने ने जितुला डीवसलं... आणि म्हटलं सांग रं
जितुने वहीवर लिहून दिल... आणि त्याने पण तसच म्हटलं
"सरला कोने में बैठ के तांदूळ निवड रही थी....!!!

      सर्व क्लास खळखळून हसत होता......पण मी तर पहिल्यांदाच तिला असं हसताना पाहिले होते.....खरच किती छान दिसत होती हसताना ती ......नवीन असल्याने दोन तीन दिवस थोडी अबोलच होती....सोनल सोबत चांगली मैत्री झाली होती  तिची.... पीटी च्या लेक्चरला  तर वेगळीच मज्जा आली होती ....

              दिगंबरला पकडत असताना तिची त्याच्या बरोबर होणारी नजरानजर.... तो तर पार बुडूनच गेला होता  तिच्यात.... त्याला पकडत असताना अचानक तिचा तोल गेला... अन त्याने तिला सावरले... आऊट तर झालाच पण ती पडता पडता वाचली ते तिलाच कळलं होत...."पल्लवी निघू या का? तिच्या मैत्रिणीने तिला हाक मारली.... तेव्हा तिचा नाव कळलं होत... पल्लवी म्हणून
"मला science ची book पाहिजी ?.....दिगंबर
"थांब देते? सोनल ने म्हटले
"अरं माझ्या कडे नायी आहे, मी तिला दिली ".... सोनल
"कुणाला?
"पल्लवी" अरे ती नवीन मुलगी.
"अच्छा, ठीक आहे.

दिगंबरला सवय होती सोनलच डबा खायची....शाळेतली पोरं कधी डबा आणत नव्हती....आज ही त्याने सोनलच्या डब्यामध्ये हात घातला....तेवढयात सोनल आली.
"व्वा...! सोनल काय मस्त हाय भाजी ".... दिगंबर
"अरे पागल सोड ते... माझा नायी तो डबा पल्लवीचा हाय? सोनल
"काय...?? पल्लवी sorry मला खरच माहिती नव्हतं."
"अरे काही हरकत नाही, घे तुला हवं तर.... पल्लवी बोलून गेली.

तेव्हा पासून दिगंबर आणि पल्लवी मधली मैत्री वाढत गेली.... तिच्या डब्याची टेस्ट घेतल्याशिवाय जेवण कधीच पूर्ण होत नव्हतं.....मुलं तर तिच्यावर टपूनच होती..... मधली सुट्टी मध्ये आम्ही नेहमी काहींना काहीतरी खेळायचो....आज साखळी साखळी खेळत असताना तिचा हात हातात आला होता..... हात काही सुटतच नव्हता हातातून..... "ये हात सोड" असं पल्लवी ने म्हटल्या बरोबर हात हातातून निसटला....तेवढ्यात सोनल ने हात पकडला.....खेळ तर चालायचाच ....
        एके दिवशी पल्लवीला दिगंबर दिसला....पाऊस खूप पडत होता.....ती छत्री घेऊन येत होती.... हा मात्र आडोशाला उभा होता ....
"अरे तिकडे काय करतोय , छत्री नाही आणली का"....पल्लवी
"नाही ना....!"
"पाऊस बघ किती पडतोय, ये मी सोडते तुला..." पल्लवी
"दिगंबर पण काही न बोलता तिच्यासोबत चालायला लागला.... तिला स्पर्श होईल म्हणून तोही थोडा अवघडल्यासारखा चालत होता....
"तुला माहिती हाय पल्लवी....! पावसात भिजण्याची मज्जाच येगळी असते...."
"हो का....!
"हो मगं काय (तिच्या अंगावर छत्रीच पाणी उडवत)
"ये वेडा आहेस का? (तिने ही थोड हसत म्हटलं)
"चल ना भिजूया...!
"नको रे घरी ओरडतील...."
दिगंबरने छत्री पकडली होती.....हवा पण खूप येत होती.....तसेच एकाच छत्रीत चालताना दोघेही थोडे भिजलेच होते......त्याने मुद्दाम छत्री सोडून दिली....आणि पूर्ण नभाच्या छायेखाली, पावसाच्या धारा झेलत दोघेही आता पूर्ण भिजले होते....ओलेचिंब झाले होते.....पल्लवीच्या पापण्यांवरून ओघळणारे पाणी खरच टपोरे मोतीप्रमाणे भासत होते....दोघेही मनसोक्त पावसात भिजले होते......
पल्लवी छत्री घेऊन निघून जात होती.... दिगंबर तिच्याकडे पाहतच होता..... तिने ही मागे वळून त्याला bye केल........        To be continued