aardhangini ti...mi tumche pran

Started by Mitali gakhare, June 14, 2016, 05:47:50 PM

Previous topic - Next topic

Mitali gakhare

 बाबा!!!म्हटल्या क्षणीच मन भरुन येते,
मनातिल गोड अश्रु डोळ्यात उतरुन पडते...

काय हा देह जो क्षणात संपुन जातो,
आणि सोडून आठवणी त्याच्या अपूर्ण आम्हाला करतो...

कुणा सांगु कुणा ऐकवु किती ते आठवतात क्षण,
एका ताटात जेव्हा आम्ही घास घेत दोघे जन...

किती कठोर देव हा कशी हि त्याची नियती,
स्वतःचा नियमाकरिता मोडली आमची मैत्री...

बाप लेक दोन शब्दात रमे ही आमची सांझही,
हसत हसत निघून गेले दिवस ते वर्ष रात्री...

हर सुखात हर दुखात ऐकू येते तुमचीच हाक,
ठेवील नाव तुमचे मनात जपुन एका कोपर्यात...

करील पूर्ण स्वप्न तुमचे होईल त्रास मला जरा,
जिवन दिले तुम्ही मला हे ऋण राहिल आयुष्यभर मनात...

दोन शब्द हेच मन माझे कधीचे सांगते,आज मात्र ते लिहावे असे जनु का वाटले....!!!!