|| क्षणांच्या ऋणात ||

Started by Ravindra Kamthe, June 15, 2016, 12:52:25 PM

Previous topic - Next topic

Ravindra Kamthe

|| क्षणांच्या ऋणात ||

ते क्षण कसे काळजात होते
गंध खोल अंतरंगात होते ||

तू होतीस इतकी जवळ की
आसमंत सारे मिठीत होते ||

क्षण हे भावले असे आज की
ऋण क्षणांचे मज ज्ञात होते ||

बहरला मोगराही असा की
फुलपाखरूही स्वप्नात होते ||

सहवास लाभला असा की
दान क्षणांचे पदरात होते ||

भरली लोचने आसवांनी की
ओंजळ मोती साठवत होते ||

मनास इतुकेच भासले की
ते आज क्षणांच्या ऋणात होते ||

रविंद्र कामठे, पुणे
भ्रमणध्वनी - ९८२२४०४३३०
रविंद्र कामठे, पुणे
भ्रमणध्वनी - ९८२२४०४३३०
इमेल - ravindrakamthe@gmail.com