आवेग

Started by dhundravi, December 28, 2009, 10:09:48 PM

Previous topic - Next topic

dhundravi



एका गारव्याच्या शाश्वत बाहुपाशात
स्वत:चं निरागस अस्तित्व झोकुन देत
........................एक नाजुक पहाट विरघळून गेली.

आपल्या नुकत्याच उमललेल्या आतुर पापण्यांच्या तरल पाकळ्यांवर
त्याच्या अलगद श्वासातले धुंद तरंग
बेहोष सुरांचं वादळ समजुन
साठवायला
तिचे कवितांनी भरलेले म्रुण्मयी डोळे
आता अगतिक झाले होते...

आसमंतात अस्वस्थ शहारा फुलवणारी
त्याच्या बेफिकिर अम्रुतभासाची मोहक चाहुल
तिच्या आसक्त पापण्यांवर
ओठांचं पाखरु ठेवत होती....

मनस्वी अबोलीच्या
निशब्द पाशात अडकलेला
स्वच्छंदी पाऊस.... ओठांवर थोपवुन
थरथरत्या मातीचा शहारता गंध घेऊन उठणा-या
बेधुंद.... मखमाली.... गुलमोहरी सुरांना
तिनी केसात गुंतवलं आणि...

ओसरत्या रात्रीचं ते बरसतं दव
ओल्याचिंब श्वासांवर गुरफटून घेणा-या गारव्याचा
पारीजातकी स्पर्श
तिच्या रोमारोमात मोहाची रगिणि छेडुन गेला....

स्वप्नाळू जाईच्या हलव्या कळीचा
तो उमलता लाजाळू शहारा
त्यानं ओठांच्या ओंजळीत धरुन
एक बेसावध फुंकर घातली अन...

..................आवेगानं ती त्याच्या
उबदार मिठीच्या बेभान धुक्यात हरवुन गेली...

... मग त्यानंतर घडण्यासारखं बाकी, असं कही उरलं नव्ह्तंच...

धुंद रवी.

santoshi.world

chhan :)
.................आवेगानं ती त्याच्या
उबदार मिठीच्या बेभान धुक्यात हरवुन गेली...

... मग त्यानंतर घडण्यासारखं बाकी, असं कही उरलं नव्ह्तंच...

nirmala.