!! आठवणींनेही भरते का हो मनात शाळा ?

Started by Mayur Jadhav, June 15, 2016, 11:16:35 PM

Previous topic - Next topic

Mayur Jadhav

!! आठवणींनेही भरते का हो मनात शाळा ?

शाळा म्हणलं की मन उत्तुंग सुखद  आठवणींनी न्हाऊन निघतं.
त्यावेळी सगळे जरी अल्लडपणा करत असले तरी प्रत्येकाला तो आजही  पुन्हा हवाहवा वाटतो
कारण तिथे क्षितीजाएवढ्या मैदानावर हवरटासारखा  खेळ खेळायला मिळायचा तर कोणाला भिंतींना कान नसलेला वर्ग मिळायचा गप्पा मारायला.
त्यावेळी अशी एखादी मैत्रीण मिळते जी आजपण वेळ नसला तरी स्वतःहून काही महिन्यांनी का होईना फोन करते हक्काने. खुशाली विचारते अन् मधेच  विचारते आठवते का गं तुला शाळेची ती वाट  वळणाची....तेव्हा थोडा वेळ निशब्द होतं अन् पुन्हा शाळेच्या आठवणींची जणू  मैफिलच मनात भरते. आज त्याच शाळेला भरभरून धन्यवाद द्यावेसे वाटतात कारण तिथेच विद्याही मिळाली अन् ही गोड आठवणींची शाळा मनात भरत असते .
ब-याच  जणांचं दुसऱ्या कोणालाही माहीत नसलेलं अन् स्वतःच्या ह्रुदयात खोल खोल एका कप्प्यात बंद असलेलं त्यांचं पहिलं प्रेम याच शाळेत होतं अन् अस्सच शाळेच्या आठवणींप्रमाणे सदैव मनात रुंजी भरवतं .....
©मयूर जाधव
8888595857