Sorry

Started by Shri_Mech, June 16, 2016, 04:34:04 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

sorry नाही समजू शकलो तुला
नाही वागलो तुझ्या अपेक्षेसारखं
तू दिलखुलास जगायचीस
पण मी तसा नाही राहू शकलो


sorry , तुझ्यासारखे छंद ना जपू शकलो
ना तुझ्या आवडीनिवडीशी एकरूप झालो
तू सगळं मन मोकळं बोलायचीस
पण मी नाही तसा बोलू शकलो


sorry तुझ्या घरच्यांमधे ना मिसळलो
ना ही तुझ्या मित्रांसोबत रमलो
माझ्याच पद्धतिने जगत राहिलो
तुझी पद्धत आजमावू ना शकलो


पण एक गोष्ट होती या सर्वांवर
वेड्यासारखा मरत होतो तुझ्यावर
तुझ्याच आठवणीत असायचो दिन रात
तूच असायचीस माझ्या श्वासाश्वासात


sorry पार केली मी हद्द मैत्रीची
अन तुझ्यात गुंतून गेलो
नव्हती तुझी इच्छा तरीही
मी कविता रचत राहिलो


ही कविता लिहिली तुझ्यावरून
राग जरासा बाजूला ठेवून
माझ्या डोळ्यातलं प्रेम आठवून
वाचशील ना असशील तिथून

Shri_Mech
Shri_Mech

vikasss

Kharch khup mast aahe .
Realitishi milti julti..

Shrikant R. Deshmane

sorry पार केली मी हद्द मैत्रीची
अन तुझ्यात गुंतून गेलो
नव्हती तुझी इच्छा तरीही
मी कविता रचत राहिलो

he khup chan aahe.. :)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]