ती आणि मी, नदीचे दोन किनारे...

Started by Shri_Mech, June 18, 2016, 12:34:04 AM

Previous topic - Next topic

Shri_Mech

ती आणि मी, नदीचे दोन किनारे...


मित्रांसोबत होतो मी उनाडपणे जगत
माझ्याच नादावर जिंदगीला नाचवत
जगण्याला पुरेपूर मजेने घेत
फिरायचो बिनधास्त या बहरलेल्या दुनियेत


अशाच एका वेगळ्या वळणावर
नजर माझी खिळली तिच्या चेहऱ्यावर
घेऊन गेलो स्वतःला जागेवर एका अजब
तिच्याशिवाय कुणीच नव्हतं तिथे माझ्यासोबत


हा चमत्कार कसा काय घडला ?
न पुजलेला देव कसा पावला ?
अहो शांत या मनाच्या रानात
प्रीतीचा वारा कसा काय सुटला ?


उडाली झोप, गेला मनाचा तोल
दिसू लागली तीच सर्वत्र अनमोल
फिरु लागली सृष्टी माझ्या सभोवताली
तिच्या भेटीची इच्छा कंठाशी आली


माझ्या प्रयत्न आले फळाला
तिच्या भेटीचा योग जुळला
तिचा मधुर आवाज मनाला भिडला
तोच स्वर सतत कानात घुमू लागला


काय सांगू मित्रांनो किती बुडालो तिच्यात
खऱ्या प्रेमाचा झरा वाहू लागला मनात
वाटलं, या झऱ्यामधे भिजवून टाकावं तिला
पण नवी होती मैत्री म्हणून मोह मी आवरला


जस जश्या वाढत गेल्या आमच्या भेटी
तस तश्या मी बांधु लागलो प्रेमाच्या गाठी
ओळख आमची आता चांगलीच होती वाढली
वाटले आता सांगावी गोष्ट आपल्या मनातली


पण अचानक एक स्फोट घडून आला
तिने सांगितले एक मुलगा आवडतो तिला
ती त्याच्यामधे मनातून होती गुंतली
माझी तर इकडे शुद्धच होती हरपली


तेव्हापासून माझ्यासाठी सगळं जग वैराण झालं
तिच्या थेंबभर प्रेमासाठी मन होतं आसुसलेलं
किती रात्री जागवल्या याचा हिशोब नव्हता राहिला
काहीच कळेना कसे आवरावे या विरह दुःखाला


प्रेमासोबत आता अश्रूंचाही झरा वाहत होता
असला त्रास देवाने नशिबात लिहिला होता
तळ्याकाठी बसून तिला आठवू लागलो
तिच्या नसण्याने मी मनातून तुटू लागलो


तिच्या सुखातच आपलं सुख हे मी जाणलं
तिच्या प्रेमापायी मी मन माझं मारलं
देवाने तिचं प्रेम होतं जिंकवलं
त्या मुलाला तिच्याशी होतं मिळवलं


आजही तिच्या आठवणीत बसतो मी एकटाच
मन नाही आता रमत मित्रांच्या घोळक्यात
वाटतं, जावं दूर तिच्या आठवणीं पासून
पण माझं मन माझीच साथ देतं सोडून


देवा, माझ्या भावनांशी का असा खेळला ?
नशिबात नसताना का जागवले या प्रेमाला ?
का हा घोर माझ्या जीवाला लावला ?
का माझ्या आयुष्याचा तमाशा करून टाकला ?

Shri_Mech
Shri_Mech

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]