साकी अन पैमाना

Started by rudra, December 29, 2009, 08:47:08 AM

Previous topic - Next topic

rudra

का माणसे वागतात बनुनी मेणाचा पुतळा
फसगत  झाली  माझी  पुरे  हा  बहाणा

चेहर्यावरती भाव निराळे हृदयात काय....
मजबूर   झालाय   इथला   दिवाना

घेऊन तरी काय फिरावी आठवण
बंद  करुनी  हृदयी  दिवाणखाना

पाहताक्षणी   डोळे   मिटून   घ्यावे
प्रेमिही देतो इथे आसवांचा नजराणा

नाचून सारे घुंगरू तुटले मैफिलीत
शब्दहीन  झालाय  आज  मैखाना

रात्रही इथली वैर्याची अनामिक
उगा खपत बसलाय जागणारा

प्रेम राहिले असे कपट होऊनी
कि, जैसा साकीस छळे पैमाना

रुद्र ...........................
snl_1408@yahoo.com

santoshi.world

Apratim  :) ........... saglyach oli chhan ahet pan hya 2 oli tar khup khup avadalya ...... its very true  :(

पाहताक्षणी   डोळे   मिटून   घ्यावे
प्रेमिही देतो इथे आसवांचा नजराणा   :'(

MK ADMIN

पाहताक्षणी   डोळे   मिटून   घ्यावे
प्रेमिही देतो इथे आसवांचा नजराणा

gr8 lines. Loved it