वाद

Started by neelr, June 19, 2016, 10:34:58 AM

Previous topic - Next topic

neelr



तुला मला विभागून जाते एक रेघ
कुणाच्या बाजूने बरसावे ह्या वादात निघून जातात मेघ

वाद येतात काही काळ आपल्यात पाहुणचार घ्यायला
मग शांत मन लागते आपलेच घर सोडून जायला

वाद असतो कि खोटा अहंकार
उरतो मग व्यवहार किती होकार किती नकार

आज आपलेच घर सांगतेय जगाला दुःखाचे कारण
काय सांगणार, वादाचे असते घराला रोज नवे तोरण

बरेच झाले वादा नंतर वाद
हवाय आता एक सवांदाचा नाद