पाऊलवाट

Started by neelr, June 19, 2016, 10:37:18 AM

Previous topic - Next topic

neelr



नागमोडी वळणेच बरी असतात
सरळ रस्तांवर चुकीची माणसे भेटतात

माणसेही रस्तांसारखी वागतात
चालता बोलता अचानक वाकड्यात शिरतात

नको रस्ता नको वळणे
नको ते मोहात वाहणे

आपली पाऊलवाट बरी
रमत जाते सावकाश घरी