अर्थ पाश

Started by शिवाजी सांगळे, June 19, 2016, 08:28:42 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

अर्थ पाश

जगण्या साठी "अर्थ" शोधता
वण वण फिरून प्रवास केला,
अर्थची तो ठरला निरर्थ अंती
सोडून सारे तो एकटाच गेला!

उरलेत केवळ पाश स्मृतींचे
कालौघात तेही विरून जातील,
सोहळे कसे, मरणाचे जगलेले
चविने का ते चघळले जातील?

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९