बाबा

Started by Dnyaneshwar Musale, June 19, 2016, 08:29:02 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

उजळणी गिरवुन
घेणारा,
मायेन अंगा खांद्यावर
उचलुन घेणारा,
दुखल खुपल
तर जिवाची ओढाताण
करणारा,
मनानं तापट
असुनही आईचं वात्सल्य
देणारा,
आज एखादा घास तो
कमी खाणार
पण उद्याची काळजी
तोच घेणार,
त्याला कसलाही
वाटत नाही भार
देत असतो मना मनाला
आधार,
तो घरात असतो
तेव्हा वाटत नाही भिती
उशीर झाला तर
बाबा नावाने आपण
आवाज करतो  किती,
घरासाठी चालु
असते त्याची नुसती तळमळ
अस्वस्थ वाटलं तरी
म्हणणार नाही होतेय मळमळ,
त्याच्या कतृत्वाची नाही
होऊ शकणार कशातच मोजमाप
तो म्हणजे बाप,
खर तर स्वतावरचा जेव्हा
सुटतो ताबा
तेव्हा सावरणारा असतो
तो फक्त बाबा.
Happy Father's day.

Vedanti

[url="http://vedantiagale.blogspot.com/"]Vedanti Agale Blogspot[/url]

Dnyaneshwar Musale

धन्यवाद