ना होतो नवा मी , ना होती ती जुनी

Started by siddheshwar vilas patankar, June 20, 2016, 04:12:15 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

ना होतो नवा मी

ना होती ती जुनी

गोष्ट चालूच होती

होती फक्त राजा न राणी II

सांगे आषाढ पाऊस

नको सोडून जाऊस

संगे  थांब तू जरासा

वाटे हृदयास दिलासा II

किती दिल्या आणा भाका

तरी चुके काळजाचा ठोका

वर्षे  क्षणात लोटली

आता क्षण वाटे मोठा II

असा काय घात झाला

झाली दुसरीच राणी

राजा दूर दूर गेला

राहिलं डोळ्यात पाणी

अन जुन्या आठवणी II


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C