महादेव कुंटे मो, 9075197777

Started by Kunte mahadev, June 20, 2016, 05:37:43 PM

Previous topic - Next topic

Kunte mahadev

मला काय वाटलं;
तर तुला काय वाटलं.
चुकीचं मी तुला ठरवलं तर ;
तू मलाच चुकीचं ठरवल.

खोटे आळ येडू आतातरी;
माझ्यावर लावू नकोस;
वेदना होतात या मला;
तू असं दुखवू नकोस.

माझ्या डोळ्यांच्या आरशात;
जर शोभत नाहीत अश्रू;
तर छेडु नकोस मला;
असं रडवूही नकोस.

असशील तू कोणा दुसर्याची;
कदाचीत माझी नसशीलही;
जरी हे खरं असेल तरी;
तू मला ते सांगू नकोस.

आता तरी किंमत लाव;
माझ्या तुज्यासाठीच्या स्वप्नांची;
नाहीतर कोणत स्वप्न;
मला दाखवूतरी नकोस.

आता तर आलीस अन् भेटलिस
अन् ऐवढ्यातच निघालिस
फक्त एक करार पाळण्यासाठी;
नाईलाजाने मला भेटू नकोस.
//

Kunte mahadev

आठवणीत कधी जेव्हा मन
वेड हरवते
कोसळणाऱ्या पावसात मग
आसवांना लावपते
लपलेच प्रेम आणि न
विसरलेल्या आठवणी
ढगालेल तेच वातावर पण
कोसळत नाहीत
आता पुन्हा त्याच टपोर्या
थेंबाच्यासरी
वाहत राहता आता फक्त
त्याच वेड्या आठवणीच्या लहरी





Kunte mahadev

जीवनाच्या  प्रत्येक  वळणावर  आठवण  येत  राहील  ,
एकत्र  नसलो  तरी  सुगन्ध  दरवळत  राहील,
कितीही  दूर  गेलो  तरी  मैत्रीचे  हे  नाते ,
आज  आहे  तसेच  उद्या  राहील
कवी~महादेव कुंटे मो, 9075197777----9130187777


//

Kunte mahadev

वेड मन माझ आज हट्ट करतय
तुझ्याकडे तुझा थोडा वेळ मागतय

सकाळी उठल्यावर तुलाच पहायच आहे
झोपेतून जागी झाल्यावर
परत तुझ्या कुशीत झोपायच आहे

भर उन्हात तुझ्या सोबत चालायच आहे
चटके बसता उन्हाचे कधी
तुला पदराच्या सावलीत घ्यायच आहे

ऋतु शिवाय पावसाला एकदा बोलवायच आहे
तुझ्यासवे चिम्ब भिजुन
तुझ्या मिठीत विरघलुन जायच आहे

शांत सायंकाळी समुद्र किनारी बसायच आहे
अबोलिच्या फुलानी सजलेला गजरा
तुझ्या हाताने माझ्या केसात माळlयचा आहे

पोर्णिमेच्या रात्रि तुझा हाथ हातात घ्यायचा आहे
चंद्राच्या मंद प्रकाशात चमकणार चांदण
तुझ्या सोबत मोजायच आहे
मन माझ तुझ्याकडे इतकाच वेळ मागत आहे
जीवनाच्या प्रत्येक ऋतुमध्ये मला
तुझ्या सोबत जगायच आहे .
कवी~महादेव कुंटे मो, 9075197777


Kunte mahadev

बघताच ज्याला भान हरवते,
समोर नसला की बैचेन मन होते
आठवणीच त्याच्या मग
विश्व बनते
यालाच म्हणतात प्रेम कदाचित,
ज्याच्यावि ना आयुष्य थांबते...♥ ♥♥


//

Kunte mahadev

अन प्रेम करायच राहुनच गेलं...
तिच्या घरच्यांशी असनारी जवळीक,
प्रेमाच्या आड येउन बसली..
जीव तिच्यावर जडुनही,
मनाला मुरड आम्ही घातली..
मनं मारायचं कामच आम्ही उभ्या आयुष्यात केलं,
अन प्रेम करायच राहुनच गेलं...
तिचा होकार असतानाही,
तिच्या घरच्यांचाच विचार केला..
सारा विचार करुन,
तिला नकारचं दिला..
उपकारांच्या ओझ्याखाली,
त्यांनी आम्हाला खोलवर गाडलं..
अन प्रेम करायच राहुनच गेलं...
एक नाते जोडावे कि
चार नाती तोडावी..
हे आम्हाला कधी, समजलेच नाही..
झाडाचा बुंधा सोडून फांद्याशी नाते जोडने, जमलेही नाही..
फुलण्या आधिच कळ्यांना (प्रेमाला) कोमेजताना पाहिलं,
अन प्रेम करायच राहुनच अन प्रेम करायच राहुनच गेलं...
तिच्या घरच्यांशी असनारी जवळीक,
प्रेमाच्या आड येउन बसली..
जीव तिच्यावर जडुनही,
मनाला मुरड आम्ही घातली..
मनं मारायचं कामच आम्ही उभ्या आयुष्यात केलं,
अन प्रेम करायच राहुनच गेलं...
तिचा होकार असतानाही,
तिच्या घरच्यांचाच विचार केला..
सारा विचार करुन,
तिला नकारचं दिला..
उपकारांच्या ओझ्याखाली,
त्यांनी आम्हाला खोलवर गाडलं..
अन प्रेम करायच राहुनच गेलं...
एक नाते जोडावे कि
चार नाती तोडावी..
हे आम्हाला कधी, समजलेच नाही..
झाडाचा बुंधा सोडून फांद्याशी नाते जोडने, जमलेही नाही..
फुलण्या आधिच कळ्यांना (प्रेमाला) कोमेजताना पाहिलं,
अन प्रेम करायच राहुनच गेलं..
कवी~महादेव कुंटे मो, 9075197777गेलं..
कवी~महादेव कुंटे मो, 9075197777


//

Kunte mahadev

आयुष्याची दोरी कुणाच्या
तरी हातात देऊन
बघा
खुप वेळ असेल
तुमचाकडे....
आयुष्यातील दोन क्षण
कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही
सुचणार...
त्या साठी तरी एकदा प्रेम
करून बघा
कवी~महादेव कुंटे मो, 9075197777

//

Kunte mahadev


आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील
जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...
तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....
माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...
कवी~महादेव कुंटे मो, 9075197777

महादेव

मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी

मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी

वाऱ्याबरोबर डोलणाऱ्या इवलाश्या रोपटयासारखी

हसण तिच खळखळणाऱ्या झऱ्यासारख

मनही तिच त्यातील निर्मळ पाण्यासारख
आहे ती अशीच अश्रुसोबत हसणारी

मनातील वादळांना मनातच थोपवणारी

भासते कधी आकाशातील चांदणीसारखी

तर कधी सागराबरोबर खेळणाऱ्या लाटेसारखी
तशी आहे ती माझ्यापासुन दुरवर

तरीही अंतःरात रुतलेली खोलवर

तुझ्या मैत्रीच्या छायेत मला क्षणभर विसावू दे

हरलो जरी मी, आपली मैत्री मात्र सदैव जिंकू दे
कवी~महादेव कुंटे