स्वप़्नातला पाऊस

Started by गणेश म. तायडे, June 20, 2016, 06:14:23 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

स्वप्नात ती माझ्या येई
हळुच मला पावसात नेई
चिंब भिजवी मला
मिठीत आवळूनी घेई
गळ्यात गळा टाकूनी
अलगद मला सांगूनी जाई
हवा तु पावसा सारखा
शमवूनी मज जाई
कोसळावे तु मजवरी
तुझ्यात वाहूनी मी जाई
थेंब थेंब प्रेम करत
गारवा उरास सोडुन देई
गडगडाट तुझ्या आठवणींचा
एकांतात मला साथ देई
वारा भन्नाट तुझ्या श्वासांचा
रोम-रोम रोमांचित होई
पाऊस जरी स्वप़्नातला
ओलेचिंब करुन जाई

- गणेश म. तायडे,
    खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com