|| पावसालाच प्रेमाने भिजवायचे ||

Started by Ravindra Kamthe, June 21, 2016, 06:22:38 PM

Previous topic - Next topic

Ravindra Kamthe


|| पावसालाच प्रेमाने भिजवायचे ||

हलकेच पावसाची एक सर आली,
भावना माझ्या चिंब चिंब भिजवून गेली ||

काळ्याभोर ढगांनी गर्दी नभात केली,
मनातही माझ्या आठवणींची गर्दी झाली ||

किती लाडिक होते तुझे ते बहाणे,
भेटल्यावर प्रेमात पुरते वाहत जाणे ||

डोळ्यांच्या कोनातून लाजून ते पहाणे,
लटकेच माझ्यावर रागावून बसणे ||

तासनतास ढगांची लगबग न्याहाळणे,
हलकेच मिठीत माझ्या तुझे विसावणे ||

वाटत राहायचे संपूच नये हा पावसाळा,
तुझ्या मायेचा पुन्हा पुन्हा येई उमाळा ||

नुसत्या आठवणींवर किती आता जगायचे,
आज आपण पावसालाच प्रेमाने भिजवायचे ||
*****
रविंद्र कामठे, पुणे.
माझ्या प्रतिबिंब -माझा शब्द संग्रह ह्या पुस्तकामधील पूर्वप्रकाशित कविता.
रविंद्र कामठे, पुणे
भ्रमणध्वनी - ९८२२४०४३३०
इमेल - ravindrakamthe@gmail.com