टिक-टिक

Started by Csushant, June 22, 2016, 03:00:29 PM

Previous topic - Next topic

Csushant

टिक-टिक टिक-टिक,
काळाची ती  पांढरी पाऊले पुढे पडतच राहणार,
त्याला कसे कळणार,
तुझ्या बाहुपाशात चुकलेल्या हृदयाच्या ठोक्यांची गणिते !

टिक-टिक टिक-टिक,
वेळेच्या सुईवर जग वेडे नाचतच राहणार,
तुला कधी उमगणार,
शतजन्म  पुरतील मला क्षण चार तुझ्या बेधुंद सहवासातले !