ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, June 22, 2016, 08:41:23 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

कधी कधी माणूस म्हणून जगायचे म्हणतो
मी माणूकिधर्म जगाला शिकवायचे म्हणतो,!

जन्मताच मारलेल्या जातीच्या शिक्क्याला
विद्रोहाच्या रबराने सरळ खोडायचे म्हणतो,!

मंदिर मस्जिद गिरजात असणाऱ्या इश्वराला
बदललेल्या जगात आता बदलायचे म्हणतो,!

खरंच असेल इश्वर मग त्यास त्यांच्या नावाने
हा लागलेला मानव संघर्ष रोकायचे म्हणतो,!

नसेल अगर ईश्वर मग दानपेटीतला पाईपाई
गरजूना निवारा,अन्नासाठी वाटायचे म्हणतो!

ज्या त्या धर्माचा ईश्वर मिळेल तेव्हा मिळेल
माणसाने भेद सोडून एकत्र यायचे म्हणतो,!

ललित कुमार
wapp7744881103
***************************