लहानगा पाऊस

Started by गणेश म. तायडे, June 22, 2016, 09:00:20 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

लहानगे व्हावे
पावसा तुझ्यासंगे
पडावे कोठेही
इथे वा तिथे
चातकापरी वाट
माझीही पहावी
मलाही झेलावे
चेहऱ्याच्या हास्यावरी
रस्त्यातले गड्डे
तुडूंब भरावे
उमलत्या फुलांना
हसू ना आवरावे
हिरवीगार चादर
डोंगराने ओढावी
नद्यानाल्यांची चाहूल
साऱ्यांना कळावी
जमिनीच्या कुशीत
मुकाट झोपावे
बनून सरी
मोकाट वाहावे

- गणेश म. तायडे,
    खामगांव
    ganesh.tayade1111@gmail.com