ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, June 23, 2016, 10:30:19 AM

Previous topic - Next topic

Lalit kumar

कधी पाण्यात राहून माश्याने
पाण्याशी वैर करायला नको
माणवजन्मी येऊन माणसाने
माणसात भेद करायला नको,!

रंगा रंगाचे झेंडे घेऊन हातात
उगाच भांडणे करायला नको
तर्क विचारबुध्दी मार्ग सोडून
मानवाने कुठे चालायला नको,!

कोण उच्च कोण निच्च सांगून
माणूस माणूस तोडायला नको
बदलत्या काळात उंच शिखर
चढतांना हात सोडायला नको,!

इतिहास पाने चाळता-चाळता
वास्तविकता विसरायला नको
कधी काळी राहिला काळजात
"काटा, आज काढायला नको,!

आपण बदलू जग ही बदलेल
बदलाला आड यायला नको
दुःख आपण झेलू काळजावर
उद्याचे सुख हरवायला नको,!

ललित कुमार
23/06/2016(1;24AM)
wapp7744881103
*************************

Shrikant R. Deshmane

आपण बदलू जग ही बदलेल
बदलाला आड यायला नको
दुःख आपण झेलू काळजावर
उद्याचे सुख हरवायला नको,!

khup chan..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]