वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे - सावरखेड ए&#

Started by santoshi.world, December 29, 2009, 01:01:22 PM

Previous topic - Next topic

santoshi.world

वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे
मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे
जल्लोष आहे आता उधाणलेला
स्वर धुंद झाला मनी छेडलेला
शहारलेल्या, उधाणलेल्या कसे सावरावे !

स्वप्नातले गाव माझ्यापुढे
दिवसाचा पक्षी अलगद उडे
फांदिच्या अंगावरती
चिमणी ती चिवचिवणारी
झाडात लपले सगे-सोयरे
हा गाव माझा जुना आठवाचा
नादात हसऱ्या या वाहत्या नदीचा
ढगात उरले पाऊसगाणे कसे साठवावे !

हातातले हात मन बावरे
खडकाची माया कशी पाझरे
भेटीच्या ओढीसाठी श्वासाचे झुंबर हलते
शब्दांना कळले हे गाणे नवे
ही वेळ आहे मला गुंफणारी
ही धुंद नाती गंधावणारी
पुन्हा एकदा उरी भेटता कसे आवरावे ?


गीत    -    दासू
संगीत    -    अजय, अतुल
स्वर    -    कुणाल गांजावाला
चित्रपट    -    सावरखेड एक गाव (२००४)

one of my fav. song :)