कोरडा पाउस...

Started by maheshkarpe4, June 23, 2016, 02:41:10 PM

Previous topic - Next topic

maheshkarpe4

वसली होती मनात तू
मनातून तू जाशील का ?
आठवणी ह्या साऱ्या
जातांना तू नेहशील का ?

म्हणाली होतीस मला तू ;
"मी श्वास आहे तुझा"
मरत आहे आज मी ;
देशील का श्वास तुझा ?

दुःख विसरण्यासाठी ;
अमृत तू देशील का ?
दुःखाच्या ह्या काळात ;
सोबत तू राहशील का ?

आयुष्याचा प्रवास हा झाला आता जुना ;
ध्येय माझे हरवलेले शोधशील का तू पुन्हा ?

अश्रु नसले डोळ्यात तरी दुःख मात्र असतं ;
चेहर्यावर माझ्या तुला फ़क्त हसूच का गं दिसतं ?

मित्र म्हणतात "तुलाच होती ना,प्रेम करण्याची हाउस"
आता कळलं , प्रेम भेटलं नाही तर नुसताच पडतो कोरडा पाउस....नुसताच पडतो कोरडा पाउस....

कवि:- महेश करपे
आवडल्यास लाइक करा